आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानाची भरपाई:चर्मकार समाजबांधवांना नुकसानाची भरपाई द्या

पाचोरा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा परिसरात ८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात २५ चर्मकार समाज बांधवांच्या घरांमध्ये पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तूंचे माेठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त समाजबांधवांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली. तसेच नुकसानग्रस्तांना अतिवृष्टीचा लाभ मिळण्याबाबत चर्चा केली.

याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव, चर्मकार महासंघाच्या जिल्हा कर्मचारी आघाडीचे बी. बी. मोरे, जिल्हा सदस्य तुकाराम गव्हाळे, रमेश सुरवाडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष विनोद अहिरे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. २५ चर्मकार समाज बांधवांच्या घरात नुकसान झाले असून नुकसान भरपाईबाबत चर्चा करताना तहसीलदार कैलास चावडे यांनी आश्वासन दिले. पूरग्रस्तांना अतिवृष्टीमध्ये सामावून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जाधव यांनी मार्गदर्शन केले.

तहसीलदारांचा सत्कार
उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते तहसीलदार कैलास चावडे यांना गौरवण्यात आले असून याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. समाजास कुठलीही अडचण आल्यास मी परिपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही तहसीलदार चावडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...