आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:बक्षीस मिळवण्यासाठी मंडळांमध्ये चढाओढ

पारोळा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गणेश मंडळांना भेट देऊन शासनाच्या नियमानुसार ज्या मंडळाने पर्यावरणपूरक मूर्ती, ध्वनीप्रदूषण विरहित, सामाजिक सलोखा, प्रबोधनात्मक, स्वातंत्र्य चळवळी संदर्भात देखावे सादर केले, तसेच वैद्यकीय शिबिर, शाळेचे विद्यार्थी यांच्या शैक्षणिक, आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक देशी खेळाच्या स्पर्धा आणि स्वच्छता, प्राथमिक सुविधा अशा प्रकारे आयोजन ज्या गणेश मंडळाने केले आहे.

त्या मंडळांना पालिकेच्या ५ सदस्यीय कमिटीने भेट दिली. यात प्रामुख्याने तहसीलदार अनिल गावंदे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सीईआे जयश्री भगत, किसान कॉलेजचे सहायक प्राध्यापक शती प्रदीप आहुजेकर या समिती सदस्यांनी पाहणी करुन मंडळांना गुण दिले आहेत. ज्या मंडळास जास्त गुण मिळाले आहेत, त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या वेळी समिती सदस्यांनी गणपती विसर्जन मार्गाची पाहणी केली. तसेच गणपती मंडळास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, म्हणून विसर्जन स्थळाची पाहणी केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...