आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पाळधी पोलिसांत कोळींविरुद्ध तक्रार अर्ज

धरणगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरूद्ध प्रक्षोभक व अवमानजन वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी यांच्यावर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, याच पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा यासाठी पाळधी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. धरणगाव येथे १ नोव्हेंबर रोजी शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर सभा झाली.

त्यात शरद कोळी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार धरणगाव येथील लाेहार गल्लीतील प्रभुदास उर्फ बालू रोहिदास जाधव (वय ५०) यांनी दिली. त्यानुसार कोळींविरूद्ध १५६ अ, २९५, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. दरम्यान, याच पद्धतीने गुन्हा दाखल करावा, यासाठी ५ ते ७ गुर्जर समाजबांधवांनी पाळधी पाेलिस ठाण्यात सहाय्यक पाेलिस निरीक्षक जिभाऊ पाटील यांना तक्रार अर्ज दिला.

बातम्या आणखी आहेत...