आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:गाेळा केलेल्या अडीच टन निर्माल्यापासून जामनेरात कंपोस्ट खताची होणार निर्मिती

जामनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जामनेर येथे गणपती विसर्जनाप्रसंगी अडीच टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. संकलित केलेल्या या निर्माल्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती श्री सदस्यांनी दिली.जामनेर शहरात ठिकठिकाणी लावलेल्या केंद्रांवर तब्बल अडीच टन निर्माल्याचे संकलन केले.

त्यासाठी शहरासह तालुक्यातील टाकळी, मालदाभाडी, नेरी, फत्तेपूर, लोहारा, केकतनिंभोरा, पाळधी, पळासखेडे मिराचे, मोहाडी, वाघारी, कळमसरा, शेंदुर्णी येथील एकूण ३२५ श्री सदस्य सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगरसेवक महेंद्र बाविस्कर, आतिष झाल्टे, जितेंद्र पाटील उपस्थित होते. रात्री ११ वाजेपर्यंत संकलित करण्यात आलेले तब्बल अडीच टन निर्माल्य टाकळी येथे भला मोठा खड्डा करून त्यात टाकण्यात आले. या निर्माल्यापासून तयार होणारे कंपोस्ट प्रतिष्ठानतर्फे लावलेल्या वृक्षांसाठी वापरले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...