आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडजोड:लोकन्यायालयात पिचर्डे येथील 10 खटल्यांमध्ये सामोपचाराने तडजोड

भडगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मोबाइल व्हॅनचे भडगाव न्यायालयात आगमन झाले. यात तालुक्यातील पिचर्डे गावातील १० खटल्यांमध्ये सामोपचाराने तडजोड करण्यात आली.

भडगाव तालुका वकील संघ व विधी सेवा समिती, दिवाणी न्यायालयाच्या संयुक्त विद्यमानाने या मोबाइल व्हॅनच्या माध्यमाने २१ रोजी भडगाव तालुक्यातील पिचर्डे व बात्सर गावी फिरत्या लोकन्यायालयाचे व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भडगाव न्यायालयात मुख्य न्यायाधीश व्ही. एस. मोरे व सह न्यायाधीश एस. एस. चव्हाण यांच्या हस्ते माल्यार्पण करून या मोबाइल व्हॅनचे पूजन करण्यात आले. तसेच भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नीलेश तिवारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद‌्घाटन करण्यात आले. त्यानंतर मोबाइल व्हॅन नियोजित कार्यक्रमासाठी पिचर्डे व बात्सर गावी रवाना झाली. व्हॅनचे पिचर्डे येथे आगमन झाल्यानंतर सरपंचांसह पदाधिकाऱ्यांसह सह न्यायाधीश एस. एस. चव्हाण, ॲड. नीलेश तिवारी, गट विस्तार अधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांचे स्वागत केले. ॲड. नीलेश तिवारी यांनी प्रास्ताविक केले. ॲड. आर. के. वाणी व सचिव ॲड. सुनील सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ॲड. बी. टी अहिरे यांनी केले. पिचर्डे गावात १० खटल्यांमध्ये सामोपचाराने तडजोड करण्यात आली.

बात्सर येथे मान्यवरांनी केले मार्गदर्शन
बात्सर येथे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. शिबिरात ॲड. प्रकाश तिवारी व ॲड. नीलेश तिवारी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ॲड. बी. टी अहिरे यांनी तर आभार सचिव ॲड. सुनील सोनवणे यांनी मानले. या प्रसंगी ॲड. मुकुंद पाटील, ॲड. बी. आर. पाटील, ॲड. रणजीत पाटील, ॲड. विनोद महाजन, ॲड. गणेश वेलसे, ॲड. विजय महाजन, ॲड. भरत ठाकरे, ॲड. उमेश महाजन, ॲड. किरण महाजन, ॲड. संजिदा शेख, इतर वकीलवृंद, तसेच सहाय्यक अधीक्षक पाखले नाना, लीगल अॅडचे संतोष कुलकर्णी, कर्मचारी भगवान बारी, विजय महाजन, बी. डी. सोनवणे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.