आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष प्राविण्यासह यश:48 व्या वर्षी एलएलबी उत्तीर्ण झाल्याने सत्कार

पाचोरा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी महेश पवार यांनी एलएलबी परीक्षेत ८५ टक्के अर्थात विशेष प्राविण्यासह यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रा.डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा.डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, नितीन पाटील, विजय सोनजे, एन. टी. पाटील यांच्या उपस्थितीत महेश पवार यांचा सत्कार करण्यात आला.

महेश झेरॉक्सचे संचालक महेश पवार यांनी आपला व्यवसाय पूर्ण वेळ सांभाळून वयाच्या ४८व्या वर्षी इच्छाशक्ती व प्रबळ आत्मविश्वासावर हे यश मिळवून दाखवले आहे. शहरात गेल्या २३ वर्षापासून व्यावसायिकता जोपासत, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले.मेहनत व सचोटीवर विश्वास ठेवून हे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...