आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचे चटके:वाढत्या महागाईविरोधात युवासेनेतर्फे जिल्हाभरात अभिनंदन, निषेध आंदोलन

एरंडोल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पारोळा, एरंडोल येथे युवासैनिकांची घोषणाबाजी

देशात रोज वाढणाऱ्या महागाईच्या अनुषंगाने एरंडोल शहरात युवा सेनेतर्फे केंद्र सरकारचे अभिनंदन करत अनोखे थाळी व टाळी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी युवा सैनिकांनी दरवाढीच्या निषेधार्थ फलक व गॅस सिलिंडरला पुष्पहार अर्पण केला. प्रास्ताविक युवा सेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन यांनी केले. समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, नितिन बिर्ला, सुनील चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर, विठ्ठल आंधळे, जावेद मुजावर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील, सुनील मराठे, चंदू जोहरी, नासिर शेख, युवराज महाजन, पिंटू मिस्त्री आदी उपस्थित होते. आंदोलनास युवा सेनेचे शहर समन्वयक अमोल भावसार, कुणाल पाटील, मोहन महाजन, गोविंदा बिर्ला, कृष्णा ओतरी, अजय महाजन, चेतन बडगुजर, अतुल मराठे, प्रसाद महाजन, राज पाटील, बबलू मराठे व युवा सैनिकांनी सहकार्य केले.

युवासेनेतर्फे केंद्र शासनाचा जाहीर निषेध
पारोळा | देशात रोज वाढत असलेल्या महागाई विरोधात केंद्र शासनाचे अभिनंदन करुन युवा सेनेच्या वतीने केंद्राचा जाहीर निषेध करण्यात आला. देशात रोज पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी यासह इतर संसारोपयोगी साधनांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. रोज वाढत्या महागाईमुळे जनता चिंतेत आहे. या महागाईला आवर घालण्यासाठी केंद्र शासनातर्फे कुठलीही ठोस पाउले उचलली जात नाहीत. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडलेली असून जनतेच्या चिंतेत भर होत आहे. रोजगारासंदर्भात कुठलेच ठोस निर्णय घेतले जात नसताना वाढत्या महागाईमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याच अनुषंगाने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळींसह संसारोपयोगी साहित्याच्या वाढत्या महागाई विरोधात पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या नेतृत्वात युवा सेनेतर्फे केंद्र शासनाचे अभिनंदन करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

एरंडोलला थाळी, टाळी बजाव आंदोलन
एरंडोल येथे युवासेनेच्या वतीने टाळी व थाळीनाद आंदोलन करताना रमेश महाजन, राजेंद्र चौधरी, शालिक गायकवाड, किशोर निंबाळकर व यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी तसेच उपस्थित युवासैनिक.

बातम्या आणखी आहेत...