आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रोटान शिक्षक संघटना जिल्हा व तालुका शाखा चाळीसगावतर्फे आयोजित ग.स. व माध्यमिक पतपेढीतील नवनियुक्त संचालकांचा सत्कार समारंभ, रा.वि.पतपेढी सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे होते. नवनियुक्त माध्यमिक पतपेढी उपाध्यक्ष राजेंद्र रणदिवे, मानद सचिव जगदीश पाटील, नवनिर्वाचित संचालक अजयकुमार पाटील, ग.स.संचालक अजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. गणेश काकडे यांनी विचार मांडले. तसेच सध्याची प्रोटान जिल्हा कार्यकारणी पुढील दोन वर्षासाठी कायम करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमास प्रभाकर पारवे (काॅस्ट्राईब विभागीय अध्यक्ष), रावसाहेब जगताप (विभागीय अध्यक्ष समता शिक्षक परिषद),मिलिंद भालेराव (प्रोटान जिल्हाध्यक्ष),मुबारक शाह (प्रोटान जिल्हा कार्याध्यक्ष),मिलिंद निकम (प्रोटान जिल्हा महासचिव),आनंद जाधव (प्रोटान जिल्हा प्रभारी), यशराज निकम (प्रोटान जिल्हा उपाध्यक्ष),सोपान भवरे (प्रोटान जिल्हा उपाध्यक्ष),अजय भामरे (समता शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष प्राथमिक विभाग), किशोर भामरे (प्रोटान जिल्हा सदस्य),विजय वाडेकर (जळगाव प्रोटान तालुकाध्यक्ष),संजय वाघ (तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक संघ), समाधान बच्छाव (सचिव माध्य. शिक्षक संघ),नितीन पाटील (टीडीएफ) उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.