आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिन:विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव; निकालपत्रांचे वितरण, ठिकठिकाणी झाले ध्वजारोहण

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले हायस्कूल
धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूलमध्ये लिपिक जे.एस.महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी जल सुरक्षा संदर्भात सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन केले. मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, शिक्षिका पी.आर.सोनवणे, एम.के.कापडणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालय
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी ध्वजारोहण केले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी ध्वजपूजन करून श्रीफळ वाढवले. यावेळी उपशिक्षक ए.डी.पाटील यांनी जल शपथपत्राचे वाचन केले. यावेळी सर्वांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली. आठवी व नववी वर्गाचा आज निकाल वाटप करण्यात आला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला निकालपत्रक देतांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप शिक्षकांनी केले.

गुड शेफर्ड स्कूल
प्राचार्या चैताली रावतोळे यांनी राष्ट्रध्वजाचे पूजन केले. शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल सोनार यांनी केले. महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगत असतांना संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी अनेक हुतात्म्यांचे योगदान आहे. आपण सर्वांनी महाराष्ट्र धर्म जोपासला व वाढवला पाहिजे, असे प्रतिपादन सोनार यांनी केले. माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख, भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, दामिनी पगारिया, नाजुका भदाणे, हर्षाली पुरभे, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड, सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख उपस्थित होते.

आनोरे विद्यालय
येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयात महाराष्ट्र दिन तसेच राष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विक्रम पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष रमेश खंडू महाजन अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव काशिनाथ मिस्तरी, संचालक जगन्नाथ महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी यांनी केले. ए.के.पाटील, आर.बी.महाले, एच.आर.महाजन, के.आर.महाजन, डी.बी.महाजन, कल्पेश वारुळे, सोमनाथ महाजन, किरण महाजन, बाळकृष्ण सुतार, प्रकाश माळी, दिलीप चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकुश पाटील यांनी केले. तर आभार सोमनाथ महाजन यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...