आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:काँग्रेस आमदारांनी केले मंत्री विखे पाटलांचे स्वागत

सावदा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खिरोदा येथेही भेट दिली. यावेळी खिरोदा येथे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांनी मंत्र्याचे जनता शिक्षण मंडळाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर स्वागत केले. पुढील पाहणी दौऱ्यात मात्र ते सहभागी नव्हते.

महसूल व पशुसंवर्धन मंत्री यावल-रावेरमध्ये पाहणीसाठी आल्यावर भाजपचे खासदार, आमदारांपासून पक्षाचे सर्व पदाधिकारी दौऱ्यात सहभागी दिसले. दरम्यान, या दौऱ्यात पशुुपालकांनी भरपाईसाठी आग्रह धरला. खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, सुरेश धनके, नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, हर्षल पाटील, हिरालाल चौधरी, नरेंद्र नारखेडे, श्रीकांत महाजन, रेखा बोंडे, भरत महाजन, वासुदेव नरवाडे, राजन लासूरकर, पद्माकर महाजन आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...