आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्नीपथ योजनेविरोधात काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन दिले. माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात एन.एस.यू.आय.युवकतर्फ निवेदन देण्यात आले. अग्नीपथ ही योजना युवकांचे भविष्य खराब करण्याची योजना आहे. या योजनेचे अनेक दुष्परिणाम देशातील युवकांना भोगावे लागणार आहेत. युवक मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन भरतीसाठी तयारी करतात. परंतु प्रचंड तयारी करूनदेखील या युवकांना सैन्यात फक्त चार वर्ष नोकरी मिळेल. निवृत्तीनंतर सूनिश्चित भविष्य नाही, निवृत्तीनंतर जी रक्कम मिळते ती पहिल्यासारखी नसेल. महत्वाचे म्हणजे समाजात सन्मान परिवाराची सुनिश्चिती नसेल, सुविधा संपतील, स्थानिक भरती पहिल्यापेक्षा कमी होईल, चार वर्षानंतर या निवृत्त सैनिकांचे काय होईल?असे अनेक प्रश्न आहेत. दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी अग्नीपथ योजना आणून युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अग्नीपथ योजना मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
यांची होती उपस्थिती कार्याध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, शहराध्यक्ष काँग्रेस के.डी.चौधरी, एनएसयुआयचे प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, एनएसयूआय शहराध्यक्ष हर्ष पवार, देवकांत चौधरी, इस्त्रायल जहागीरदार, सुमित पाटील, मयूर पाटील, मजित तडवी, प्रेम पाटील, कार्तिक पाटील, घनश्याम पाटील, जगदीश पाटील, दीपक बडगुजर, पुष्कर पाटील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.