आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:चाळीसगावात तीन हजारांची लाच घेताना हवालदार जेरबंद

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहितेच्या छळप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी, तीन हजार रूपयांची लाच स्वीकारतांना चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचा हेड काॅन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात अडकला. दीपक देविदास ठाकूर (रा. खरजई नाका, चाळीसगाव) असे लाचखोराचे नाव आहे. धुळे एसीबीने ग्रामीण पोलिस ठाण्यातच मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.

तक्रारदाराच्या बहिणीचा दहा वर्षापूर्वी विवाह झाल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळीशी वाद झाला होता. त्यामुळे विवाहिता एक वर्षापासून तक्रारदार भावाकडेच राहत होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळप्रकरणी ितच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास हेड काॅन्स्टेबल दीपक ठाकूरकडे हाेता. या गुन्ह्याच्या तपासाबाबत तक्रारदाराने हवालदार ठाकूर याच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या आराेपीतांवर कारवाईसाठी पाच हजारांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मंगळवारी धुळे एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यादरम्यान तक्रारदाराकडे ठाकूर याने तीन हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली. त्यासंदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पंचासमक्ष सापळा रचून कारवाई करण्यात आली. लाचखोर दीपक ठाकूरला लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

यांनी केली कारवाई : ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळे विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, पोलिस नाईक भूषण खलाणेकर, भूषण शेटे, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, राजन कदम, शरद काटे, कैलास जोहरे, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, जगदीश बडगुजर, प्रविण पाटील, वनश्री बाेरसे, रोहीणी पवार यांच्या पथकाने केली.

तीन महिन्यात चौथी कारवाई
या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपुर्वी मेहुणबारे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक झाली होती. तर दाेन महिन्यांपुर्वी शहर पाेलिस ठाण्यातील दाेन कर्मचाऱ्यांना पकडले हाेते. तीन महिन्यात तालुक्यात एसीबीची चौथी कारवाई झाली

बातम्या आणखी आहेत...