आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रासाचा मुद्दा:पाचोरा येथे दूषित पाणीपुरवठा; गटारी तुंबल्या; भाजपचे निवेदन

पाचोरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर परिषदेकडून सर्वच भागातील नागरिकांना होणारा दूषित व गढूळ पाणीपुरवठा व गटारीमध्ये तुंबलेल्या घाणीच्या विरोधात आवाज उठवत भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक सामान्य नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शाेभा बाविस्कर यांना निवेदन देऊन उपस्थित केला आहे.

काही दिवसांपासून पाचोरा पालिकेतर्फे पिण्याचे पाणी दूषित व गढूळ पुरवले जात असून या पाण्यामुळे संपूर्ण शहरात डायरिया, कॉलरा यासारख्या आजारांची साथ पसरली आहे. शहरातील सर्वच नागरिक या परिस्थितीमुळे अडचणींना सामोरे जाताना दिसत आहेत. तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे भुयारी गटार सपशेल अपयशी ठरली असून नियोजनशून्य कामामुळे भुयारी गटारीच्या चेंबरमधील पाणी नियमित गटारीत वळवले आहे. रस्त्यावर ही घाणीचे साम्राज्य तयार झाले. त्यामुळे विविध आजारांच्या साथीचा फैलाव होण्यास सुरुवात झाली. पालिका प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असून यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार, नंदू सोमवंशी, सरचिटणीस दीपक माने, रमेश श्यामनाणी, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, जगदीश पाटील, वीरेंद्र चौधरी, टिपू देशमुख, भैया ठाकूर, सईद खान, गोविंद देवरे, विशाल साठे, जगन्नाथ सोनवणे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...