आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदान:तितूर नदीच्या स्वच्छतेसाठी 71 हजारांचे दिले योगदान ; डोंगरी नदीपात्रांच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तितुर व डोंगरी नदीपात्रांच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाल्याने अनेक सामजिक संस्था मदतीसाठी पुढे येऊ लागल्या आहे. मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा टीमसह पाच पाटील ग्रुप, नगरपालिका अशी मदतीची साखळीही जोडली जात आहे. येथील सायकलिंग ग्रुपने मशीन भाड्यासाठी ७१ हजार रुपयांचे योगदान देत इतरांपुढे बांधिलकीचा आदर्श उभा केला आहे.

या ठिकाणी सायकलिंग ग्रुपचे पदाधिकारी व शहर पोलिस निरीक्षक के.के. पाटील यावेळी उपस्थित होते. चाळीसगाव सायकल गृप यांच्या दातृत्वातून तितुर नदीत छत्रपती शिवाजी पुलापासून ते दयानंद पुलापर्यंतच्या तितुर नदी स्वच्छता अभियानात वापरण्यात येणाऱ्या मशिनीच्या भाड्यासाठी हे ७१ हजार रुपये दिले आहेत. सायकलिंग ग्रुपमधील प्रीतेश कटारिया, सुरेश मदानी, शांताराम पाटील, नीलेश कोतकर, राजेंद्र वाणी, राम घोरपडे, सोपान चौधरी, नीलेश निकम, टोनी पंजाबी, अरुण महाजन, योगेश पवार यांच्या दातृत्वापासून प्रेरणा घेत नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी लोकसहभागाचे आवाहन मिशनचे प्रमुख तथा मुंबईच्या आयकर विभागातील सहआयुक्त डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांनी केले आहे. त्यास प्रतिसाद देत मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...