आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:शेंदुर्णीत कोरोना रुग्ण ;आरोग्य यंत्रणा अलर्ट

शेंदुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेंदुर्णी येथे परवा एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून लसीकरणाला वेग आला आहे. गावात आढळेल्या कोरोना रुग्णाला कोणतीही लक्षणे नसल्याने विलगीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, सरस्वती विद्या मंदिरात संस्थेच्या अध्यक्षा कौमुदी साने आणि मुख्याध्यापक राजेंद्र गुजर यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक नाना माळी व कर्मचारी तसेच चेन्नई येथील वाय. आर. जी. केअर संस्थेचे प्रतिनिधी चेतन रोकडे व मनीषा बाविस्कर यांनी शिबिर आयोजित केले होते. या वेळी लसीकरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...