आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगेहात अटक:लाचखोर वैधमापनशास्त्र निरीक्षकाला अटक

पाचोरा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल पंपाच्या नोझल मशिनच्या प्रमाणपत्रासाठी सहा हजार रूपये लाचेची मागणी करणाऱ्या, पाचोरा येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

पहूर येथील एका पेट्रोलपंप धारकाला चार नोझल मशिनचे प्रमाणपत्र हवे होते. यासंदर्भात त्यांनी पाचोरा येथील वैधमापनशास्त्र विभागाकडे अर्ज केला होता. येथील निरिक्षक विवेक सोनू झरेकर (वय ५४) यांनी त्यांना प्रत्येक नोझलसाठी १५०० रुपये प्रमाणे एकूण ६ हजार रूपये लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे संपर्क साधला होता. मंगळवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचून निरीक्षक विवेक झरेकर यांना लाच स्विकारतांना झरेकरला रंगेहाथ पकडले.

बातम्या आणखी आहेत...