आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज दि.२० रोजी तहसीलमध्ये एकाच वेळी आठ टेबलांवर, सकाळी १० वाजता मतमाेजणीला प्रारंभ होणार आहे. पहिला निकाल अर्ध्या तासात जाहीर हाेणार आहे. मतमोजणीच्या दोन फेऱ्या होतील. पहिल्या फेरीत मेहुणबारे, चिंचखेडे, उंबरखेड, पिंपळवाड म्हाळसा या गावांपासून मतमोजणी सुरुवात होईल. त्यानंतर सांगवी, करजगाव, हिंगोणेसीम, शिदवाडी, गणेशपूर, विसापूर, उपखेड, दरेगाव, आडगाव या गावांची मतमोजणी होईल.
तहसीलदार अमाेल माेरे यांनी मतमाेजणीच्या तयारीचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना याेग्य त्या सूचना केल्या आहेत. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, एम.एस.पठाण, पक जाेंधळे व कर्मचारी उपस्थित हाेते. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षीक निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाला होता. त्यातील डामरून व अंधारी या दाेन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर उर्वरित १४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ५५ केंद्रांवर मतदान झाले. १४ गावात सरपंच पदासाठी ४८ तर सदस्य पदासाठी ३११ उमेदवार रिंगणात होते. रविवारी शांततेत ७९.०२ टक्के मतदान झाले. रेकॉर्डब्रेक मतदान झाल्यामुळे आता निकालाची उत्सुकता आहे.
मतमोजणीदरम्यान असेल पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात शहर पाेलिस स्टेशनचे निरिक्षक के.के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त असेल. मतमोजणीच्या कालावधीत शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियाेजन केले आहे. १५ कर्मचारी स्पेशल पाॅइन्टवर नेमण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे एपीआय तुषार देवरे यांनी दिली. गरज पडल्यास पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येईल. एेकण्यासाठी मतमाेजणी केंद्रात ध्वनीक्षेपक लावले आहे.
मतमोजणीच्या दोन फेऱ्या होणार मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी, प्रत्येकी आठ मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यक, मदतनीस व इतर असे ४० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मतमोजणीच्या एकूण दोन फेऱ्या होणार आहेत. तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनात मतमोजणीस सुरूवात होईल. पहिल्या पाच गावांपासुन मतमाेजणीला प्रारंभ होणार आहे. नंतर अधिक मतदान केंद्र असलेल्या गावांची मतमाेजणी हाेणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.