आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहने असून वाहनधारकांना वाहने लावण्यासाठी शहरात कुठेही अधिकृत वाहनतळ नाही. त्यामुळे वाहनधारकांना कुठेही आपली वाहने लावावी लागतात. शासन व पालिका सर्व प्रकारचा कर नागरिकांकडून घेतात म्हणून पालिकेने शहरात ठिकठिकाणी विनामूल्य वाहनतळ तयार करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. असे न झाल्यास वाहनधारकांसोबत पालिका आवारात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा २० रोजी उपमुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शहराध्यक्ष योगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, योगेश पांडे, प्रशांत अजबे, विवेक देठे, ज्ञानेश्वर सोनार, अमोल देठे, छोटू अहिरे, उमेश गायकवाड, नितीन राजपूत यांच्यासह मराठा महासंघाचे शहराध्यक्ष खुशाल बिडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वाहन मालकांना नाहक भुर्दंड वीर सावरकर चौक परिसरात तहसीलदार कार्यालय, शहर पोलिस स्टेशन, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, वन विभाग कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, शिक्षण विभाग आणि शहर, स्टॅम्प वेंडर कार्यालय अशा सर्व ठिकाणी येणारे लोक दुचाकी वा चारचाकी वाहनाने येतात. केवळ तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाण्यासमोर अधिकृत दुचाकी पार्किंग आहे. ते देखील छोटे असल्याने या कार्यालयांच्या अवतीभवती लोक वाहने लावतात. परंतु, चारचाकी वाहने लावण्यासाठी अधिकृत वाहनतळ नसल्याने लांब गाड्या उभ्या करुन लोकांना येथे यावे लागते. तर काही वाहन-मालक जवळच वाहने लावतात. त्यामुळे रस्त्यावर अडथळा झाल्यास त्या वाहनांचे वाहतूक पोलिस फोटो काढतात. त्यामुळे वाहन चालकांना ऑनलाइन दंड भरावा लागतो. वाहने विकत घेताना टॅक्स भरून ही शहरात अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहन-मालकांना विनाकारण दंड भरावा लागत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.