आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात फायटरने मारहाण, शिवीगाळ करून कमरेस लावलेले पिस्तुल एकाच्या कपाळाला लावून खिशातून एक हजार रुपये काढून पसार झालेला शहरातील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. तर न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरातील फरशी राेडवरील रहिवासी विशाल विजय सोनवणे हा एका निर्जन स्थळी लपून बसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती.
त्यावरून त्यांनी पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोडे, हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, पोलिस नाईक हिरालाल पाटील, कॉन्स्टेबल सागर साळुंखे, राहुल चव्हाण, सुनील पाटील यांच्या पथकला त्यास पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पथकाने निर्जन स्थळावरून विशाल सोनवणे यास शिताफीने ताब्यात घेतले. विशाल सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल अाहेत. त्यास अमळनेर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.