आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद मेळावा:इंधवे येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मंत्री धनंजय मुंडेंची टीका; महाविकास आघाडीला धक्का लागत नसल्याने जातीचे राजकारण

अमळनेर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सत्तेत आल्याने ते पाडण्यासाठी विरोधक अनेक प्रयत्न करत आहे. मात्र महाविकास आघाडीला काही धक्का लागत नसल्याने त्यांनी आता जाती-धर्माचे राजकारण सुरु केले आहे.

दोन धर्मात तेढ निर्माण करायची आहे, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्र सोडले.

पारोळा तालुक्यातील इंधवे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा संवाद मेळावा शनिवारी (दि.७) झाला. यावेळी ते बोलत होते. मंत्री मुंडे म्हणाले, शरद पवार यांनी अठरा पगड जातीच्या नागरिकांना सोबत घेऊन राजकारण केले. छगन भुजबळ यांना प्रदेश अध्यक्ष व उपमुख्यमंत्री केले. मी स्वत भटक्या जातीचा असल्यावरही मला विरोधी पक्षनेतेपद दिले. राजकारणात होत्याच नव्हत करण्याची क्षमता शरद पवार यांच्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...