आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:काम करणाऱ्यांवरच होते टीका; परंतु टीकाकारांना घाबरू नका : आमदार

अमळनेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पातोंडा उपबाजार समितीत पेट्रोल पंपाचे अनिल पाटलांच्या हस्ते उद्घाटन

कृउबाचा पेट्रोल पंप हा उत्पन्नाचेच साधन नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेली सुविधा आहे. यातून शेतकऱ्यांच्या इंधनाची, पैशांची व वेळेची बचत होईल. यासाठी प्रशासक मंडळाचे कौतुक करतो. परंतु, काम करणाऱ्यांवर टिका होते. परंतु, टिका करणाऱ्यांना घाबरू नका, असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी केले.

तालुक्यातील पातोंडा उपबाजार आवारातील पेट्रोल पंपाच्या उद‌्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार साहेबराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन पाटील, अश्विन यादव, मिलिंद कुडे, सरपंच भरत बिरारी, केदार पवार, सोसायटीचे चेअरमन सुनील पवार, संदीप पवार, प्रशासक प्रा. सुरेश पाटील, एल. टी. पाटील, संभाजी पाटील, बी. के. सूर्यवंशी, भाईदास अहिरे, जितेंद्र राजपूत यांच्यासह नगरसेवक श्याम पाटील, विवेक पाटील, अनिल शिसोदे, जयवंत पाटील, रवी पाटील, मुख्तार खाटीक, शिवाजी पाटील, महेंद्र पाटील, भागवत पाटील, रिटा बाविस्कर, कविता पवार, योजना पाटील, मंदाकिनी भामरे हजर होते. सूत्रसंचालन संजय पाटील तर बी. के. सूर्यवंशी यांनी आभार मानले.

मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी त्यांनी प्रशासक मंडळाने केलेल्या शेतकरी हिताच्या कामांचा आढावा सादर केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, इंडियन ऑइलचे अश्विन यादव, माजी संचालक धनगर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशासक मंडळाचे केले कौतुक अमळनेर ते चोपडा दरम्यान कुठेच पेट्रोल पंप नसल्याने शेतीसाठी लागणाऱ्या इंधनासाठी शेतकऱ्यांना वेळ वाया घालवून लांब जावे लागत होते. यासाठी बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील व प्रशासक मंडळाने पातोंडा उपबाजारात पेट्रोल पंप उभारला आहे. त्यातून उत्पन्न ही वाढणार आहे. काम करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. मात्र, कामाची तत्परता व जनतेबद्दल आस्था असली की लोकोपयोगी कामे होऊन संस्थेचाही विकास होतो, असे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगून प्रशासकांचे कौतुक केले.

खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव
या वेळी खान्देश शिक्षण मंडळात निवडून आलेले चेअरमन हरी वाणी, व्हॉइस चेअरमन योगेश मुंदडा, डॉ. अनिल शिंदे, नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, विनोद पाटील, डॉ. संदेश गुजराथी, उपाध्यक्ष माधुरी पाटील, जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, अडत असोसिएशनचे पदाधिकारी हर्ष बोथरा, ऋषभ पारख, योगेश वाणी, हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष रमेश धनगर, सचिव डॉ. उन्मेष राठोड, सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.