आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेती संदर्भातील सरकारी धोरणांच्या अपयशाचा परिपाक म्हणजे शेतकरी आत्महत्या हाेत. खर्च आणि उत्पन्नातील तफावतीमुळे शेतीकडे वळण्यास आजचे युवक इच्छुक नाहीत. त्याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत. भावनिक मुद्दे समोर करून युवकांची ऊर्जा भलत्याच कामासाठी वापरली जाते. त्यामुळेच पीक कर्जाच्या मंजुरीसाठी सिबिल स्काेरची लावलेली अट तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी सांगितलेल्या कर्जमुक्तीला अर्थशास्त्रीय सिद्धांताची व व्यवहार्यतेची जोड होती. शेती कर्जमुक्त होणे म्हणजे संपूर्ण सातबारा कोरा होण्यासोबत, शेतमालाच्या भावावरील एपीएमसी अॅक्ट यासारख्या किमती नियंत्रित करणाऱ्या कायद्यातून शेतकऱ्यांना मोकळीक मिळणे हे त्यांना अभिप्रेत होते.
कर्जमुक्ती, बाजारपेठा, तंत्रज्ञान, संरचना या गोष्टी शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाल्या पाहिजे. त्या मिळाल्यावरच शेती व्यवसाय व्यवहार्य होईल, असे पाटील यांनी सांगितले. रब्बीची तयारी महिनाभरात सुरू होईल. त्यासाठी पीक कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सिबिलची आडकाठी झाली आहे. रिझर्व बँकेच्या निकषानुसार आत्ता पीक कर्ज व मध्यम तसेच दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी सिबिलचा (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) निकष लागू करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर ६०० ते ७०० पर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांनाच बँक पीक कर्जाचे वाटप करते. खरे तर पीक कर्ज हे कर्ज नसून उत्पादनासाठी दिलेली अग्रीम रक्कम असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.