आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अति-पावसाचा फटका:वाकोद परिसरात पिकांना अति-पावसाचा फटका

वाकोदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाकाेदसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून निरंतर सुरु असलेल्या दमदार व रिमझिम पावसामुळे पिकांवर परिणाम हाेत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात यंदा उशिरा पावसाला सुरुवात झाली. असे असले तरी कमी-अधिक पावसामुळे खरिपातील पेरण्या पूर्णत्वास आल्या आहेत. खरिपातील पिके बहरत असताना आता सातत्याने रिमझिम पाऊस सुरू आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर मोठा परिणाम होत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या महिन्यात रिमझिम पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. शिवाय नुकसानीचे पंचनामे व्हावेत, यासाठी तलाठी, महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

वाकोदसह वडगाव, वडाळी, पिंपळगाव, जांभोळ, तोंडापूर या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून निरंतर रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी अतिरिक्त पावसामुळे गवताची वाढ झाली मात्र कापूस पिकाची वाढ झालेली नाही. उलट अनावश्यक गवत वाढले आहे. कापूस पिक पिवळे पडत आहे. तर गवतावर तणनाशक फवारणी किंवा मजूर लावून काढावे लागत आहे. यावर खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना हैराण झाले आहेत. सध्या मजुरीचे दर वाढले असून, काही गावात मजूर मिळणेही कठीण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना आसपासच्या गावात जाऊन मजुराचा शोध घ्यावा लागताे.

बातम्या आणखी आहेत...