आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारवा:बहाळ परिसरात तापमानवाढीमुळे‎ गिरणा नदीपात्रात पोहणाऱ्यांची गर्दी‎

बहाळ2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बहाळ‎ खान्देशात गेल्या तीन-चार‎ दिवसांपासून मार्च महिन्यातच ‘मे‎ हिट’चा तडाखा जाणवू लागला‎ आहे. चाळीसगाव तालुक्यासह‎ परिसरातील तापमानाचा पाराही ४०‎ अंशावर पोहचला असून वाढत्या‎ उन्हाच्या चटक्यांमुळे दुपारनंतर‎ गावातील मुख्य रस्ते निर्मनुष्य होत‎ आहेत. त्यामुळे जणू अघोषित‎ संचारबंदी लागू झाल्याचे चित्र‎ पहावयास मिळत आहे.‎ बहाळ परिसरातही तापमान दोन‎ दिवसांपासून अचानक वाढले आहे.‎ मात्र ऋषिपांथा येथे वाहणाऱ्या‎ गिरणा नदीला पाणी असल्याने‎ लहान मुले, तरुण व प्राण्यांनाही‎ उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून‎ पोहण्याचा आनंद घेताना पहावयास‎ मिळाले. वाढत्या तापमानाचा‎ परिणाम परिसरातील दैनंदिन‎ जनजीवनावर झाला. उकाड्यामुळे‎ नागरिक हैराण झाले असून पंखे व‎ कुलरने देखील समाधान होत‎ नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात‎ येते. यापूर्वी गावातील तापमान ३२ ते‎ ३५ अंश सेल्सियस होते. त्यात वाढ‎ होऊन ते आता ४०-४२ अंशावर‎ गेल्याने उन्हाचे चटके वाढले‎ आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी‎ व्यापारी व्यवसाय बंद ठेऊन आराम‎ करणे पसंत करत आहेत. परिसरात‎ वाढलेल्या उष्णतेमुळे ‘मे हिट’चा‎ तडाखा आताच जाणवू लागला‎ आहे.‎

सकाळी, संध्याकाळी‎ शेतीकामांना प्राधान्य‎ शेतीचे कामे डोक्यावर असून‎ तापमानाचा पारा चढत असल्याने‎ भल्या पहाटे व सायंकाळच्या वेळी‎ शेतातील कामे केली जात आहेत.‎ उकाड्यापासून दिलासा‎ मिळण्यासाठी नागरिक वृक्षांच्या‎ सावलीची मदत घेताना दिसत‎ आहेत. सूर्याची दाहकता असह्य‎ झाल्याने नागरिक दिवसा घराबाहेर‎ जाणे टाळत आहे. तर परिसरातील‎ रस्तेही निर्मनुष्य होत असल्याचे चित्र‎ आहे. शेतातील नांगरटीसह‎ मशागतीची कामे सकाळी व‎ संध्याकाळच्या सुमारास मोठ्या‎ प्रमाणात केली जात आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...