आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन महामंडळ:चाळीसगाव आगारात बसेसची रोज तपासणी; बसचा प्रवास सुखरूप अन् सुरक्षितच आगारप्रमुखांचे प्रवाशांना आवाहन

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमधील तांत्रिक चुकांमुळे अपघात होऊ नये, याची काळजी एसटी महामंडळाकडून घेतली जाते. दिवसातून एकदा बसची तपासणी होते. तांत्रिक चुका पूर्ण निर्दोष झाल्यानंतरच बस आगारातून सोडली जाते. बसचे डॉक्टर अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरकडून बस ओके आहे, असा इशारा दिल्यानंतरच बस पुढच्या प्रवासाला निघते. त्यामुळे बसचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित होतो.

एसटीचा प्रवास सर्वांत सुरक्षित समजला जातो. मागील चार वर्षांत एसटी वाहनांच्या जवळपास ४५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात केवळ ५ ते ६ अपघातांमध्ये एसटी चालकांची चूक होती. त्यासोबत एसटीत तांत्रिक बिघाड होऊन अपघात होण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. उर्वरित प्रकरणात समोरील वाहनांच्या चुकांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अपघाताचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले आहे. अपघाताचे प्रमाण वाढू नये किंवा अपघात होऊच नयेत, यासाठी वाहनचालकांना रिफ्रेशर म्हणून दरवर्षी सहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. बहुतांश वेळा खराब रस्त्यामुळे अपघात होतात. एकूण अपघातांपैकी ५ ते १० टक्के अपघातांमध्ये एसटी चालकांची चूक आढळून आली आहे. त्यामुळे एस.टी.चा प्रवास हा सुरक्षित मानला जात असताे.

दाेष आढळल्यास विशेष प्रशिक्षणानंतर हाेते परीक्षा
प्रशिक्षणदरम्यान काही दोष आढळल्यास त्यांना पुन्हा विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण घेतल्यानंतर तीन समित्यांसमोर त्यांना परीक्षा द्यावी लागते. ३० किलोमीटर वाहन चालवून त्यांच्यातील दोष तपासले जातात.

चालक रुजू होण्यापूर्वी २८ दिवस दिले जाते प्रशिक्षण
एसटी चालकांना ड्यूटीवर रुजू होण्यापूर्वी एसटी महामंडळाकडून तब्बल २८ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यादरम्यान चुका तपासल्या जातात. रात्री वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण दरम्यान विना अपघात गाडी चालवणाऱ्या चालकांनाच कामावर रुजू केले जाते.

पावसाळ्यात घेतली जाते विशेष काळजी
बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी आगारातील मेकॅनिकल डिपार्टमेंटचे इंजिनिअर संपूर्ण बसची तपासणी करतात. बस-चालकांच्या सूचनेनुसार बसमधल्या तांत्रिक चुका दूर करतात. त्यानंतर बस आगारातून सोडली जाते. तसेच पावसाळ्यात विशेष काळजी घेतली.
संदीप निकम आगारप्रमुख, चाळीसगाव

बातम्या आणखी आहेत...