आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:अमळनेर तालुक्यात वादळामुळे सहा गावांमधील घरांचे नुकसान

अमळनेर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात १० रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने सहा गावातील घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी झाडे पडल्याने रस्ते बंद झाले होते. तालुक्यात शुक्रवारी सर्वत्र वादळी पाऊस व गारपीट झाली. प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी सुटी असताना ही तलाठ्यांना प्राथमिक नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पाठवले होते. तालुक्यातील जळोद, सावखेडा, मांडळ, रंजाने, नंदगाव, धार आदी गावातील घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर्ण घर व पत्रे तर काही ठिकाणी भिंती पडल्याने कुटुंब उघड्यावर आले आहेत. मांडळ येथे माध्यमिक शाळेच्या दोन खोल्यांचे पत्रे उडाल्याची माहिती मुख्याध्यापक बापू चव्हाण यांनी दिली. मांडळ परिसरात ही अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. अमळनेर ते जळोद रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रस्त्यावरील झाडे हटवण्यात आली. सोमवारी पंचनामे करुन नेमके किती नुकसान झाले याचा अहवाल प्राप्त होणार आहे. दरम्यान, कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

बातम्या आणखी आहेत...