आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानडुकरांकडून नुकसान:वाडे परिसरामध्ये मक्याचे रानडुकरांकडून नुकसान

भडगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाडे शिवारातील वडाळे रस्त्यालगत असलेल्या छगन नामदेव पाटील व भाऊसाहेब नामदेव पाटील या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढवून मका पिक आडवे पाडून मोठे नुकसान केले आहे. वन विभागाने तत्काळ नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मक्यासह इतर पिकांकडे रानडुकरांसह वन्य प्राण्यांनी मोर्चा वळवला असून या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वन विभागाने या रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही वाडे परिसरातील शेतकऱ्यांकडून आहे. वाडे येथील छगन पाटील व भाऊसाहेब पाटील या दोन्ही शेतकरी भावांचे वाडे, वडाळे रस्त्यालगत वाडे शिवारात शेत आहे. त्यांनी अडीच एकरात मक्याची लागवड केली होती. त्या पिकाचे रानडुकरांनी मोठे नुकसान केले असून आताही नुकसानीचे सत्र सुरुच आहे. संपूर्ण पिकाचे नुकसान होईल, अशी साधार भीती त्यांनी व्यक्त केली. वाडे, बांबरुड प्र.ब., मळगाव, वडाळे, तांदुळवाडी आदी भागात शेतकरी त्रस्त आहेत. वन विभागाने तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व पिके वाचवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...