आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिनावल गेल्या ३१ डिसेंबरला वडगाव (ता.रावेर) शिवारातील तीन शेतकऱ्यांची साडेचार हजार केळी खोड समाजकंटकांनी कापून फेकले होते. या प्रकरणाची चौकशी व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी सर्व शक्ती सेनेने फैजपूरचे प्रांताधिकारी व डीवायएसपींना निवेदन दिले. वडगाव शिवारातील चिनावल येथील पंकज नारखेडे, वडगाव येथील डॉ. मनोहर पाटील व दगडू पाटील यांच्या शेतातील साडेचार हजार केळीचे खोड अज्ञात व्यक्तींनी कापून फेकले.
यात शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. यापूर्वी देखील गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चिनावल परिसरात शेतातील उभी केळी कापून फेकणे, शेती साहित्य चोरीचे सत्र सुरू होते. तेव्हा देखील शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन ते रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा हे प्रकार झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी प्रांताधिकारी कैलास कडलग व डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांच्याकडे करण्यात आली. शक्ती सेनेचे राज्याध्यक्ष तथा भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव प्रा. संजय मोरे, सर्व शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, गजानन काडेले, युवक जिल्हाध्यक्ष मयूर कोळी, विष्णू मोरे, विजय तायडे, राजेंद्र पाटील, धनराज कोळी, राजेंद्र सपकाळे, उमेश तायडे, सचिन सुरवाडे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.