आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहाळसह परिसरातील बंधारे गिरणा नदीचे भरावेत, अशा शेतकऱ्यांच्या मागणीबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले हाेते. त्यानंतर लगेच कालव्यातून पाणी साेडल्याने आता हे बंधारे भरु लागले आहेत.
नारळी नदी व उतावळी नाल्याच्या उगमस्थानावर पुरेसा पाऊस न पडल्यामुळे ऑगस्ट महिना सुरु झाला तरी या नद्यांवरील सर्व बंधारे कोरडे ठाक होते. त्यामुळे विहिरींची जल-पातळी खोल गेली होती. बहाळसह परिसरात जुलै महिन्यात रिमझिम पाऊस झाला हाेता. मात्र, दमदार पाऊस न झाल्याने नदी, नाले, बंधारे, विहिरी हे जलस्रोत कोरडे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळाची चिंता लागली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कळमडू, आडळसे, पोहरा, खेडगाव, बहाळ या भागातून जाणाऱ्या नारळी व उतावळी या नदीवरील बंधारे पांझण डावा कालव्यातून पाणी सोडून भरावे, अशी मागणी केली होती. नारळी नदीवर १४ तर उतावळी नदीवर ८ बंधारे आहेत. त्यांना देखील भरण्यात येणार आहे. दरम्यान, ‘दिव्य मराठी’त २२ जुलैला या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ४ आॅगस्टला नारळी व उतावळी नदीत ५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्यामुळे विहिरींच्या जल-पातळीत वाढ होत आहे. तर बंधारे भरणार असल्याने याचा हजारो हेक्टर क्षेत्राला लाभ हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.