आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:नेपाळ आंतरराष्ट्रीय परिषदेत पहूर येथील शिक्षकांचा डंका; शिक्षक शंकर भामेरे, हरिभाऊ राऊत यांचा संघर्षमय प्रवास

पहूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळची राजधानी काठमांडू शहरातील त्रिभुवन विद्यापीठात आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय ‘इंग्लिश लँग्वेज टीचर्स अँड अप्लाइड लिंग्विस्टिक’ परिषदेमध्ये पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख शंकर रंगनाथ भामेरे यांनी शोधनिबंध सादर केला तर हरीभाऊ भानुदास राऊत यांनी परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवला.

२८ आणि २९ मे २०२२ दरम्यान काठमांडू येथे झालेल्या या परिषदेत शंकर भामेरे यांनी‘टीचिंग इंग्लिश ड्यूरिंग पेन्डॅमिक सिच्युएशन’या विषयावर शोध निबंध सादर केला. विद्यापीठातर्फे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोपाल पांडे, प्रा. भावना, प्रा. लीना हैद, प्रा. डॉ. जोसेफ निकोलस, डॉ. लक्ष्मण गुणवली आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. शंकर भामेरे यांनी बसस्थानकावर चहा विकून शिक्षण घेतले असून हरिभाऊ राऊत यांनी मजुरी करून शिक्षण घेतले आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

बातम्या आणखी आहेत...