आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पित्याच्या पार्थिवाला मुलींनी दिला खांदा ; घाडवेल येथे तीन मुलींनी पार पाडले मुलांचे कर्तव्य

चोपडा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील घाडवेल येथील रहिवासी असलेले दत्तात्रय आनंदा पाटील (वय ८०) यांचे ९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थवाला तीन मुलींनी खांदा दिला. तसेच स्मशानभूमीत अग्निडागाचे कर्तव्य मुलींनी पार पाडले.घाडवेल येथील रहिवासी असलेले दत्तात्रय आनंदा पाटील (वय ८०) यांचे दि ९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा १० रोजी गावातून काढण्यात आली.

दत्तात्रय पाटील यांना तीन मुली असल्याने या तिन्ही मुलींनी पित्याला शेवटचा निरोप देताना, पार्थिवाला खांदा दिला. शेवटच्या क्षणी अंतयात्रेत पित्याला शेवटचा निरोप देताना तिन्ही मुलींनी मुलांप्रमाणे सर्व जबाबदारी पार पाडली. दत्तात्रय पाटील यांच्या तिन्ही विवाहित मुलींच्या पुढाकाराचे कौतुक केले जात आहे. त्यांची मुलगी कांचन दीपक गुजर यांनी वडिलांच्या पार्थिवाला अग्नीडाग दिला. मुलगा हा वंशाचा दिवा असतो असे म्हटले जात असले, तरी मुलीदेखील आई-वडीलांसाठी सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात, असा संदेश या माध्यमातून दिला.

सामाजिक बदलाचे समाजाकडून स्वागत
स्व. दत्तात्रय पाटील यांना कांचन गुजर (पुणे), मिराबाई पाटील (जामनेर) व ललिता पाटील (खेडभोकरी) या तीन मुली आहेत. तालुक्यातील वर्डी गावातही काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थिनीने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. त्यानंतर आता घाडवेल गावात विवाहित मुलींनी ही परंपरा कायम राखली आहे.

बातम्या आणखी आहेत...