आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभडगाव तालुक्यातील कजगाव येथील सोनार गल्लीत शनिवारी दुपारी दाेन दराेडेखाेरांचा एका दुकानातून साेन्या-चांदीचा एेवज लांबवण्याचा प्रयत्न फसला. दुकानदाराने आरडाआेरड करताच बाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण, दाेन दराेडेखाेरांनी ४ पिस्तुलच्या सहाय्याने सर्वांना वेठीस ठेवत पाेबारा केला. कजगाव येथे मुख्य बाजारपेठेतील सोनार गल्लीत बालाजी ज्वेलर्स या दुकानावर शनिवारी दुपारी ४ वाजता अज्ञात दाेन व्यक्ती कार(स्विफ्ट)ने साेन्याच्या वस्तू तयार करण्याच्या बहाण्याने आत आले. या वेळी बालाजी ज्वेलर्सचे संचालक उमेश विनाेद बाेरा हे एकटेच दुकान हाेते. दुकानात उमेश बाेरा हे एकटेच असल्याचे पाहुन त्या दाेघा दराेडेखाेरांनी आपल्या जवळील पिस्तुल बाहेर काढून बाेरा यांच्याकडून दुकानातील एेवज हिसकावण्याचा प्रयत्न केला.
परंतु, घटनेचे गांभीर्य आेळखून दुकानदार बाेरा यांनी लागलीच आरडाआेरड केली. बाेरा यांची आरडाआेरड पाहून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. परंतु, दाेन्ही दराेडेखाेरांनी चार पिस्तुल हातात घेवून नागरिकांना वेठीस धरले. त्यानंतर या दाेघांनी पिस्तुलचा धाक दाखवून कारमध्ये बसल्यानंतर पाेबारा केला. याच वेळी पाेलिस ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही त्या दराेडेखाेरांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दराेडेखाेर नागद रस्त्याने पसार झाले. ही माहिती पाेलिस नाईक नरेंद्र विसपुते यांनी नगरदेवळा पाेलिसांना कळवली. तसेच त्यांनी स्वत: दराेडेखाेरांचा पाठलाग सुरूच ठेवला. परंतु, साेयगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात दराेडेखाेरांनी कार साेडून पाेबारा केला. ही कार चाेरीची हाेती. तर दराेडेखाेर हे २५ ते ३० वयाेगटातील हाेते.
यांनी केला पाठलाग
दराेडेखाेरांना पकडण्यासाठी पाेलिसांना कजगावसह नेरी व परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य केले. या घटनेची माहिती मिळताच पाेलिस उपअधीक्षक चाेपडे, भडगाव पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, हवालदार विलास पाटील, सचिन वाबळे, पाेलिस नाईक नरेंद्र विसपुते, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पाेलिस उपनिरीक्षक चाैबे, लक्ष्मण पाटील, नगरदेवळा येथील सहाय्यक फाैजदार कैलास पाटील, हवालदार विनाेद पाटील, नरेंद्र शिंदे, स्वप्नील पाटील तसेच होमगार्ड व कजगावच्या पाेलिस पाटलांनी परिसर पिंजून काढला. परंतु, ताे-पर्यंत दराेडेखाेर पसार झाले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.