आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सावखेडा येथे तापी पुलाखाली, चार वर्षीय अनोळखी बालकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना ३ रोजी आढळला. या घटनेची माहिती सावखेडा येथील पोलिस पाटील भरत निकुंभ यांनी पोलिसांना कळवली.
पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक नरसिंग वाघ, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, सुनील वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पुलावर एक दुलई आढळून आली. बालकाच्या शरीरावर फोड आढळले. त्याला त्वचा रोग असावा किंवा जलचर प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडले असावे, असा अंदाज डॉ.जी.एम.पाटील यांनी वर्तवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.