आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:जामनेरात 13 घंटागाड्यांचे आमदार महाजन यांच्याहस्ते लोकार्पण; अखेर कचरा संकलनाचा प्रश्न लागला मार्गी

जामनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जामनेर नगरपरिषदेने घेतलेल्या १३ घंटागाड्या व एका ट्रॅक्टरचे आमदार गिरीश महाजन यांचेहस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या जामनेर शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जामनेर नगरपरिषदेच्या नादुरूस्त घंटागाड्या वापरायोग्य राहिल्या नव्हत्या.

या प्रमुख कारणासह अन्य काही कारणांनी कचरा संकलनाचे कंत्राटदार व नगरपरिषद प्रशासनात बरेच रणकंदन झाले. अखेर कंत्राटदाराने ठेका सोडून दिल्याने भाडोत्री ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा संकलनाची वेळ नगरपरिषद प्रशासनावर आली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने १३ घंटागाड्या व एक ट्रॅक्टर खरेदी केले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आमदार गिरीश महाजन यांचेहस्ते या घंटागाड्यांचे लोकार्पण झाले. उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...