आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:शिवणी येथील प्रवेशद्वाराचे लोकार्पण; कोरोना योद्धा पोलिस पाटलांचा सत्कार

भडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिवणी येथे वीर शिरोमणी क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधून नुकत्याच बांधलेल्या प्रवेशद्वाराचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

स्वर्गीय हिलाल फत्तेसिंग पाटील व स्वर्गीय सिंधूबाई हिलाल पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने स्वखर्चातून गावाचे प्रवेशद्वार बांधले आहे. या प्रवेशद्वाराचे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधून विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमदार किशोर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. सतीश भास्करराव पाटील, माजी आमदार दिलीप ओंकार वाघ, वेले येथील राजेंद्र गंगाधर पाटील यांच्यासह संजय पाटील, डॉ. विशाल पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, डॉ. प्रमोद पाटील, हर्षल पाटील, जे. के. पाटील, प्रवीण पाटील, बाळासाहेब पाटील, शिवणीचे सरपंच, सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थिती होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अरुण गुजराती व सर्व मान्यवरांनी खुमानसिंग पाटील यांच्या परिवाराने अशाच प्रकारे चांगले कार्य करत रहावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. दरम्यान, कोरोना योद्धा म्हणून भडगाव तालुक्यातील पोलिस पाटलांचा सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे शिवणी येथील माजी सरपंच खुमानसिंग पाटील यांनी आयोजन केले होते.

बातम्या आणखी आहेत...