आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिदळे परिसर:खोलीकरणही गरजेचे ; काम झाल्यास पाणीटंचाई, सिंचनाबाबत मिळणार काहीअंशी दिलासा, ब्रिटिशकालीन पाझर तलावाची दुरुस्ती कळीचा मुद्दा

भडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील महिंदळे येथे पाण्याचा स्त्रोत म्हणून नदी नाही की मोठे धरण नाही. येथील शेतकरी फक्त नाल्यांवर बांधलेल्या केटीवेअर बंधाऱ्यांवर अवलंबून राहून शेती करतात. निसर्गाने साथ दिली तर बरे, नाही तर डाेक्यावर कर्जाचा डाेंगर चढतो. अशा स्थितीत येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीसह खोलीकरणाचे काम झाल्यास गाव सुजलाम् सुफलाम् होऊ शकते. मात्र प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तो कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या उन्हामुळे तलाव आटण्याच्या मार्गावर आहे. तलावाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी वेळोवेळी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे साकडे घातले. हा पाझर तलाव उन्हाळ्यात गावाला वरदान ठरताे, परिसरातील गुरांची तहान भागवतो. तरीही या तलावाकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांना पडला आहे. महिंदळे गावाजवळून जामदा डावा कालवा गेला आहे. परंतु त्याच्या पाण्याने येथील फक्त बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येतात. ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी गत महिंदळेकरांची झाली आहे. जर या कालव्याचे पाणी लिफ्टद्वारे या तलावात टाकले तर गावाचा पाणी प्रश्न सुटून लगतची हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊ शकते. परंतु त्या दृष्टीने कोणी विचार करताना दिसत नसल्याची खंत व्यक्त होते.

गाळामुळे साठवण क्षमता घटली या तलावात चार वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून तसेच आमदार किशोर पाटील यांनी मदतीला दिलेल्या जेसीबी मशिनीद्वारे दोन कि.मी. वरून जंगलातील वाहून जाणारे पाणी चारी खोदून तलावात आणले. परंतु या तलावाची साठवण क्षमता कमी असल्यामुळे हा तलाव लवकर भरतो व लवकर आटतो. त्यामुळे तलावाच्या भिंतीची उंची वाढवून खोलीकरण करावे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास गावाला जाणवणारी पाणी टंचाई जाणवणार नाही.

बातम्या आणखी आहेत...