आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शवविच्छेदनानंतर जागेवरच अंत्यसंस्कार:सावखेडा येथे वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावखेडा बसस्टँडपासून एक किमी अंतरावर, अमळनेर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरण ठार झाले. मुंगसे येथील भानुदास पाटील हे दुपारी या रस्त्याने जात असताना त्यांना मृत हरीण आढळले. त्यांनी पारोळा वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम देसले यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक सुप्रिया देवरे, वन कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील व अधिकार पारधी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पातोंडा येथील पशुधन अधिकारी डॉ. रवींद्र गाडे, डॉ. सतीश भदाणे यांनी पथकासमोर जागेवरच मृत हरणाचे शवविच्छेदन केले. त्याच ठिकाणी मृत हरणावर अग्नीसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पोलिस पाटील भरत निकुंभ, विजय पाटील, भानुदास पाटील, रतन वैदु, दुर्गादास वैदु आदींनी सहकार्य केले. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. वाहनधारकांनी या भागात वाहनांचा वेग कमी करावा.

बातम्या आणखी आहेत...