आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:दीपाली सय्यदवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ; पंतप्रधानांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेच्या विरोधात

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी पंतप्रधानांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेच्या विरोधात येथील भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून २६ मे रोजी व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्य शब्दात वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पंतप्रधानांच्या प्रतिमेची तसेच देशाची बदनामी होत असल्याने भारताचे नागरिक म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्याचे या वेळी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांविषयी बदनामीकारक विधान करणे, हा एक गंभीर स्वरूपाचा व दंडनीय गुन्हा आहे. तर दीपाली सय्यद यांनी केलेले वक्तव्य गंभीर स्वरूपाचे असून त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर पद्धतीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी व पोलिस निरीक्षकांना पाचोरा भाजप महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले. या प्रसंगी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा साधना देशमुख, शहराध्यक्ष ज्योती चौधरी, उषाताई पाटील, सुरेखा कोळी, कल्पना तडवी, प्रिया कोळी, सखुबाई पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...