आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्थान:अंजाळेकर महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान ; गेली दोन वर्षे कोरोनामुळे या पायी दिंडी सोहळ्यावर मर्यादा आली होती

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंजाळे गावातील श्री जगन्नाथ महाराज मंदिरातून आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी पंढरपूरसाठी पायी दिंडी निघते. ही दिंडी मंगळवारी सकाळी मार्गस्थ झाली. तत्पूर्वी, सोमवारी यावल शहरातील महर्षि व्यास यांच्या पादुका पालखीने अंजाळे पर्यंत आणण्यात आल्या. तेथून अंजाळेकर दिंडीसोबत या पादुका देखील पंढरपूरला नेण्यात येतात. अंजाळे गावात वै. जगन्नाथ महाराज मंदिर आहे. या मंदिराचे विद्यमान गादी पती तथा वै.जगन्नाथ महाराजांचे उत्तराधिकारी धनराज महाराज यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी आषाढी वारी पंढरपूर दिंडी निघते. या दिंडीत यावल शहरातील श्री महर्षी व्यासोनारायण महाराजांच्या पादुका देखील सहभागी करून त्या पंढरपुरात नेण्यात येतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे या पायी दिंडी सोहळ्यावर मर्यादा आली होती. मात्र, यंदा पूर्वीच्या उत्साहात ही दिंडी रवाना झाली. त्यासाठी यावल शहरातून श्री व्यासोनारायण भगवान यांच्या पादुका सोमवारी सायंकाळी अंजाळे येथे मुक्कामी आणल्या गेल्या. नंतर मंगळवारी सकाळी धनराज महाराज, चिंतामण महाराज, सोमनाथ महाराज व सचिन महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती श्री जगन्नाथ महाराज मंदिराची दिंडी भुसावळ मार्गे पंढरपूरच्या दिशेने निघाली.

असा आहे दिंडीचा मार्ग : अंजाळे येथून निघालेली दिंडी भुसावळ, वराडसीम, गाडेगाव, नाचणखेडा, सोयगाव, उंडणगाव, वांगी, उपडी, अंधारी, बोधेगाव, फुलंब्री, हर्सुल, गेवराईमळा, तोंडाळी, वाहेगाव, श्री क्षेत्र पैठण, बोधेगाव बाजार, तिंतरपणी, पाडळी, पाटोदा, खर्डा, जेकटेवाडी, सोनारी, जनार्दन कोठा, कुर्डूवाडी, आष्टी अशा ठिकाणी मुक्काम करत ३ जुलै रोजी पंढरपूर गाठेल.

बातम्या आणखी आहेत...