आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील संत सखाराम महाराजांच्या पायी पंढरपूर दिंडीची २५० वर्षांची परंपरा, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडीत झाली होती. मात्र आज ही दिंडी रवाना होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता दिंडी वाडी संस्थानातून प्रस्थान करणार आहेत. २४ दिवसांत ५५० किमीचा पायी प्रवास करून ८ जुलैला ही वारी पंढरपुरात पोहोचेल. बुधवारी दुपारी सडावण (ता.अमळनेर) येथे दुपारी पालखीचा विसावा आहे, तर रात्री पारोळ्यात पहिला मुक्काम होणार आहे. नंतर गुरुवारी सकाळी वारी आडगावकडे रवाना होईल. पुढे भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागद, बेलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाना, टाकळी, दौलताबाद, वाळूज, म्हारोळा, बिडकीन, पैठण, शेवगाव, चितळी, पाथर्डी, माणिकदवंडी, धामणगाव, कडा, आष्टी, आरणगाव, फकराबाद, नानज, जवळा, करमाळा, निंभोरे, वडशिवगे, दहिवली, करंबजमार्गे ८ जुलैला दिंडी पंढरपूरला पोहोचेल. पालखीच्या मार्गात ठिकठिकाणी दिंडीच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. पारंपरिक मुक्कामाशिवाय अन्य ठिकाणी, वारकऱ्यांसाठी भोजन, फराळाची व्यवस्था भाविकांनी केली आहे.
परतीचा प्रवासही पायी आषाढी एकादशीला मानाच्या पालखीचे स्वागत करून वारीसोबत आलेले भाविक विठुरायाचे दर्शन घेतील. तसेच १० जुलैला पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होतील. त्यांनतर वारी परतीच्या प्रवासाला रवाना होईल. परतीत ४० दिवसाचा सुमारे ६५० किमीचा पायी प्रवास करून वारी पुणे, देहू, आळंदीमार्गे अमळनेरला पोहोचेल.
दीड हजार भाविकांचा दिंडीत असेल सहभाग वारीत सुमारे दीड ते दोन हजार भाविक सहभागी होतात. यंदा धुळे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबारसह इतर जिल्ह्यातील भाविक वारीत सहभागी होणार आहेत. अमळनेर ते पंढरपूरपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी पारोळा येथील एका भाविकाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.