आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:महसूलचा दर्जा मिळाल्यानंतरही नऊ ग्रा.पं.ची ऑनलाइन नाही नोंद, संतप्त ग्रामस्थांचे उपोषण

चाळीसगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना गेल्या चार वर्षापासून महसुलाचा दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र, या गावांची ऑनलाइन नोंद झाली नाही. परिणामी ही गावे शासकीय योजना व इतर लाभांपासून वंचित आहेत. या गावांना न्याय मिळावा, या मागणीसाठी संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच हे सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चाळीसगाव तालुक्यातील चैतन्यतांडा, इच्छापूर क्रमांक १, ३, ३सह हरिनगर, साईनगर, शामवाडी, तांडा नंबर ३२, सुंदरनगर, दीपनगर व आधीचे गोरखपूर, वाघरी, नाईकनगर असे एकूण ९ व यापूर्वीच्या ३ तांड्यांना गेल्या चार वर्षापूर्वी महसुली गावांचा दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र, चार वर्षे उलटूनही या गावांची ऑनलाइन नोंद झाली नाही. परिणामी सातबारा उतारा, नकाशा व आकार-बंद काढता येत नाही. त्यामुळे शासकीय लाभांसह इतर लाभापासून ही गावे वंचित राहत आहेत. या महसूल प्राप्त गावांची ऑनलाइन नोंद लावण्यासाठी वारंवार चाळीसगावचे भूमी अभिलेख यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, आजपर्यंत काेणतीच कार्यवाही झालेली नसल्याने या गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ १ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहिल, असा निर्धार केल्याचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी सांगितले हाेते.

यांचा उपाेषणात सहभाग
उपोषणात चैतन्यतांडाच्या सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंद राठोड, बोढरे येथील सरपंच संजय जाधव, नमोबाई राठोड, चांगदेव राठोड, रवींद्र राठोड, पंडीत चव्हाण, रायसिंग राठोड, साईदास चव्हाण, रतन आडे, महादू राठोड, नाना सोनवणे, विक्रम राठोड, विठ्ठल चव्हाण, सुराबाई चव्हाण, चांदोबाई राठोड, छबीबाई राठोड, जनीबाई आडे, कलीबाई आडे, चंद्रकलाबाई आडे, सुगराबाई राठोड, धर्मा चव्हाण, भाऊलाल चव्हाण, कोमल जाधव, रवींद्र राठोड, विकास राठोड, किरण राठोड, विनीत राठोड, जिजाबराव राठोड, काशिनाथ राठोड, विनोद राठोड, विजय चव्हाण, भाऊलाल चव्हाण व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

तहसीलदारांनी ग्रामस्थांची घातली समजूत
तहसीलदार अमाेर माेरे यांनी लागेच दखल घेत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. तसेच तांत्रिक अडचणी व शकपूर्तता पूर्ण करून मूळ प्रकरण बोढरे, हरिनगर येथील १६ आॅगस्टपर्यंत व करगाव, इच्छापूर तांडा क्रमांक १,२,३ व चैतन्य तांडा क्र.४ शकपूर्तता करून फेर ३१ ऑगस्ट पावेतो तसेच सप्टेंबर २०२२ अखेर वरखेडे बु., दीपनगर, आंबेहाेळ साईनगर, चितेगाव, शामवाडी ,वलठाण तांडा क्र.३२, चिंचगव्हाण, सुंदरनगर, रोकडे, वाघारी तांडा, गोरखपुर पावेतो शकपूर्तता करू, असे आवाहन तहसीलदारांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदाेलन स्थगित केले.

बातम्या आणखी आहेत...