आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळेगाव, टाकरखेड्यासह परिसरात वन्य प्राण्यांनी हैदोस घातला असून यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या संदर्भात वन विभागाने लक्ष देऊन समस्या साेडवण्याची गरज असून याबाबत शेतकऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तळेगाव तसेच टाकरखेड्यासह परिसरात हरण, नीलगाय, रोही व अन्य वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांनी ठिबकच्या सहाय्याने कापसाची लागवड केली आहे.
परंतु, वन्य प्राणी हे पीक उध्वस्त करत आहेत. मात्र, वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी हंगामाला बसलेला फटका सहन करुन यावर्षी शेतकऱ्यांनी जमवाजमव करून ठिबक संचाच्या सहाय्याने कापसाची लागवड केली आहे. तर यंदा पीक कर्ज वेळेवर न मिळाल्याने त्यातच विकास सोसायट्यांच्या निवडणुका असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास अडचणी आल्या.
सर्वच शेतकऱ्यांना कंपाउंडसाठी अनुदान द्यावे
तळेगावसह टाकरखेडा, सावरला, आमखेडा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे शेतीच्या नुकसानीचे प्रमाण ही वाढले आहे. शासन शेतीच्या रक्षणासाठी कंपाउंड मंजूर करते. मात्र, ते केवळ वन विभागाच्या शेजारील शेतीलाच. परंतु, आता वन्य प्राण्यांनी सरसकट आपला मोर्चा सगळीकडेच वळवल्याने सर्वच शेतकऱ्यांना कंपाउंडसाठी अनुदान मिळावे, अशीही मागणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.