आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिरुप युवा संसद हा प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेणे म्हणजे खूपच अवघड विषय आहे. परंतु याच युवा अभिरुप युवा संसदेतून विद्यार्थी हा अनुभवातून नेतृत्व करायला शिकेल. समाजकारण करत राजकारणाकडे नेतृत्व करत पुढे जाता येते. विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा तसेच कर्तव्यास महत्त्व देत नेतृत्व गुण विकसित करून आपली स्वतःची चांगली प्रतिमा तयार करावी, असे प्रतिपादन युवा संसद कार्यशाळा व स्पर्धेचे समारोप समारंभाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण निकम यांनी केले.
येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ५ ते ७ मे दरम्यान हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचा समारोप गुरुवारी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ.पवन पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.योगिनी पाटील, पत्रकार संघाचे सचिव अजय कोतकर, प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जी.डी. देशमुख, उपप्राचार्य डॉ.एस.डी. महाजन, कार्यशाळा समन्वयक डॉ.आर.पी. निकम, डॉ.आर.बी. चव्हाण, प्रा. राहुल सुरळकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रा.राहुल मनोहर सुरळकर आणि डॉ.रवी चव्हाण यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.