आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पिर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांचा उरूस दाेन िदवसांवर अाला आहे. उरूसाच्या काळात राज्यासह देश-विदेशातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. त्यामुळे पोलिस, नगरपरिषद प्रशासन तसेच दर्गा कमेटी ट्रस्टतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. उरूस काळात येणाऱ्या भाविकांना कुठलीही असुविधा होऊ नये म्हणून विशेष खबरदार घेतली जात आहे.
रविवार (दि.५)पासून उरूसाला सुरुवात होणार असून, ६ रोजी संदल व ७ रोजी तलवार मिरवणूक निघेल. चाळीसगाव येथील सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या पीर मुसा कादरी बाबांच्या उर्सला ७३२ वर्षे पूर्ण झाले अाहेत, यंदाचे हे ७३३ वे वर्षे आहे. १० दिवस चालणाऱ्या उर्स यात्रोत्सवाची सुरूवात बामोशी बाबांच्या समाधीच्या स्नानाने होते.
गुलाबपाणी, दुध व सुगंधी अत्तराने कबरीचे शाही स्नान केले जाते. दुसऱ्या दिवशी परंपरेप्रमाणे संदल मिरवणूक निघते. ही मिरवणूक वाजत गाजत बाबांच्या समाधी स्थळावर पोहोचते. तिसऱ्या दिवशी पूज्य तलवार मिरवणूक निघते. ही भव्य मिरवणूक उर्सचे आकर्षण आहे. हिरव्या चुडी चादरीत गुंडाळलेली ही तलवार बँडच्या सुरवटीत, ढोलताशांच्या गजरात रात्रीनऊ वाजता बाबांच्या समाधी स्थळावर पोहोचते. अनेक भविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर दर्ग्यातील पवित्र स्थानावर चादर चढवतात.
या चादरीची ढोल ताशांचा गजरात मिरवणुक काढत चादरी सोबत शेरणी, न्याज व गुलाबाची फुले अर्पण केली जातात. अप्पर पाेलिस अधीक्षक रमेश चाेपडे, सहाय्यक पाेलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पाेलिस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर्गास्थळी १५ पोलिस अधिकारी व २०० कर्मचाऱ्यांचा माेठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दर्ग्यावर १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून वायरलेस टाॅवरसह बॅरिकेड लावण्यात आले आहे. उरुस सोहळ्याची तयारी पूर्णत्वाकडे आहे.
प्रवेशासाठी अन् बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग
१० दिवस उरूस चालनार असुन रविवार दि. ५ पासून उरूसाला सुरूवात होईल. येणाऱ्या भाविकांच्या मुलभूत गरजा पुरविण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे, दर्गा कमेटी ट्रस्टचे सदस्य शेख रहमान शेख जमाल मुजावर यांनी सांगितले. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होवू नये यासाठी दर्ग्यात प्रवेशासाठी व बाहेर निघण्यासाठी दोन वेगळे मार्ग करण्यात आले आहेत. अतिक्रमीत दुकानदारांकडून जागा मोकळी केली अाहे. तलवार मिरवणुकीची तयारी केली जात आहे.
७ राेजी तलवार मिरवणूक
पूज्य तलवार मिरवणूक जुन्या नगरपालिकेजवळील तलवार भवन, भालचंद्र देशमुख यांचे निवासस्थाना ७ राेजी सांयकाळी ६ वाजता सुरू होईल. या वेळेस पूज्य तलवारीचे मानकरी गोकुळ शरद देशमुख हे असतील. या वेळेस सुरगाणा संस्थानाचे श्रीमंत कुमार महाराज रोहितरावराजे पवार देशमुख उपस्थित राहतील, अशी माहीती पूज्य तलवार स्थानप्रमुख भालचंद्र देशमुख यांनी बोलताना िदली.
पालिकेकडून स्वच्छता
काेराेनामुळे दाेन वर्षे साध्या पद्धतीने उरूस साजरा झाला हाेता. यंदा दर्ग्याला रंगरंगोटी, स्वच्छतेसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्याधिकारी प्रशांत ठाेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेकडून दर्ग्याच्या बाजुच्या नदीपात्रातील परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. भाविकांसाठी मुबलक स्वच्छ पाण्याची व्यवस्था आहे. यात्रेतील करमणूकीची साधने आधीच डेरेदाखल झाले आहेत. ऊरूसात दुकाने थाटण्यासाठी मुंबई, औरंगाबाद, धुळे, नाशिक, कन्नड येथील व्यावसायिक आले आहेत. त्यात पाळण्यांबरोबर इतर साधनांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.