आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीचे प्रदूषण:नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी भक्तांनी निर्माल्य दान करावे

अमळनेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नदी पात्रातील निर्माल्य विसर्जन रोखून नदीचे प्रदुषण टाळावे आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या स्तुत्य हेतूने येथील स्मितोदय फाउंडेशनने नगर परिषदेच्या सहकार्याने विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलनाचा उपक्रम हाती घेतला आहे. संकलन केलेले निर्माल्य पालिकेकडे देऊन यातून खत निर्मिती करण्यात येणार आहे.माजी आमदार तथा स्मितोदय फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता वाघ व उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

यासाठी नियोजन केले असून गणेश विसर्जनाच्या पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात जवळपास सर्वच परिसरात १०० पेक्षा अधिक ठिकाणी निर्माल्य संकलनाचे स्टाॅवलवर कलश ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय नगर परिषदेच्या मूर्ती संकलन स्थळी ही निर्माल्य स्वीकारले जाणार आहे. या उपक्रमास स्मितोदय फाउंडेशनचे कार्यकर्ते सहकार्य करत आहेत. गाेळा केलेले निर्माल्य पालिकेच्या चोपडा रस्त्यावरील प्रकल्पात आणून या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाईल. हे खत शेती व वृक्ष वाढीसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे निर्माल्य नदीत विसर्जित न करता स्मितोदय फाऊंडेशनकडे जमा करावे, असे आवाहन स्मिता वाघ यांनी केले आहे. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ही नदीत विसर्जित न करता पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्राकडे द्यावात, असे आवाहन वाघ यांनी केले आहे.

अमळनेर शहरात येथे असतील निर्माल्य संकलन केंद्र
पैलाड, गांधलीपुरा, बाहेरपुरा, काेष्टी वाडा, तोलानी मार्केट, आठवडे बाजार परिसर, सराफ बाजार, वाडी चौक, माळी वाडा व भोई वाडा, कुंटे रोड, शिरुड नाका, देशमुख बंगला, मंगलमूर्ती कॉलनी, पटवारी कॉलनी, भगवा चौक, मराठा मंगल कार्यालय, सुरभी कॉलनी, भालेराव नगर, गुरुकृपा कॉलनी, आर. के. नगर, अशोकराव देशमुख नगर, न्यू प्लॉट, बंगाली फाईल, केशव नगर, साने नगर, तांबेपुरा, गलवाडे रोड, पिंपळे - ढेकू रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती. तर शेवटच्या दिवशी मामाजी व्यायाम शाळा, वाडी चौक (समाधी मंदिर जवळ) व बहादरपूर नाका येथे मूर्ती संकलन केंद्र असतील.

बातम्या आणखी आहेत...