आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:धूम स्टाइलने पोत हिसकावली, औरंगाबादच्या भामट्याला अटक

चाळीसगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलासाेबत पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्याने ताेडून नेल्याचा प्रकार १८ जूनला घडला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत सोनसाखळी लांबवणाऱ्या भामट्याला शोधून औरंगाबाद जिल्ह्यातील पडेगाव येथील घरुन अटक केली.

शहरातील हनुमान वाडीतील रहिवासी सुनंदा प्रमोद पाटील (वय ३५) या १८ रोजी सकाळी ११.२५ वाजेच्या सुमारास आपल्या ८ वर्षीय मुलासह शाळेची पुस्तके घेण्यास गेल्या होत्या. त्या घराकडे पायी येत असताना हनुमान वाडीतील कुलकर्णी यांच्या घरासमोर एक व्यक्ती काळ्या रंगाच्या शाइन या दुचाकीवर आला. त्याने सुषमा पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने तोडली ताे शासकीय विश्राम गृहाच्या दिशेने पळून गेला.

सुषमा पाटील यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. परंतु, रस्त्यावरील कुणीही त्यांना मदत केली नाही. भामट्याने पोत जोरात ओढल्याने सुषमा पाटील यांच्या गळ्याला दुखापत झाली हाेती. चोरट्याने ७० हजारांची सुमारे २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चाेरुन नेली हाेती. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सोन्याची पोत चाेरणारा दुचाकीवरील भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यामुळे त्याचा छडा लागला.

बातम्या आणखी आहेत...