आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा तालुक्यातील आडळसे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी दिलीप शिवराम पाटील हे विजयी झाले. त्यांना ५६८ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय खंडेराव पाटील यांना ३१९ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत विजयी झालेली उमेदवार असे (कंसात मिळालेली मते) : वाॅर्ड क्रमांक १- वाल्मीक विक्रम मोरे (२२२), गंगुबाई रामा भिल (२४२), वैशाली बालू पाटील (२१८), वाॅर्ड क्रमांक २- मालुबाई ज्ञानेश्वर कोळी (१२४), रेखाबाई कैलास पाटील (१२७ ), वाॅर्ड क्रमांक ३- केवळबाई विठ्ठल पाटील (२०८) व सुनंदाबाई राजेंद्र पाटील (२२३). विजयानंतर जल्लाेष करून आनंद साजरा करण्यातआला. येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदकिशोर बैरागी यांनी काम पाहिले.आडळसे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी दिलीप पाटील विजयी झाल्याने जल्लाेष करताना कार्यकर्ते, नागरिक.
जळगाव शहरातील नेहरू नगरातील रहिवासी पुरुषोत्तम गोविंद जोशी यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते नीलेश जोशी यांचे वडील होत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.