आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव:द्विदल पक्षीय पद्धतीसाठी वीरशैव लिंगायत समाजाने काढली दिंडी

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाळीसगाव येथे जिल्हा समितीने केले स्वागत

अमेरिका, इंग्लंड व फ्रान्स या देशांप्रमाणे भारतातही द्विदल पक्षीय पद्धत असावी, दिल्लीत नवीन संसदेच्या नव्याने तयार हाेणाऱ्या इमारतीला जगज्योती महात्मा बसवेश्वर संसद भवन असे नाव द्यावे या मागण्यांबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देण्यासाठी कर्नाटक राज्यातील विजापूर येथून दिल्लीला जाण्यास निघालेल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या पायी दिंडीचे चाळीसगावात स्वागत झाले.

या पदयात्रेत १० पुरुष व ४ महिला अशा १४ जणांचा समावेश आहे. त्यांचे शुक्रवारी शहरातील कन्नड रस्त्यावर स्वागत करण्यात आले. दिंडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बापुराय कुलप्पा लोणी यांनी, बहुदलीय राजकीय व्यवस्थेत मतांचे विभाजन होते. जिंकणाऱ्या उमेदवारास अर्ध्यापेक्षा जास्त मते मिळत नाही. त्यामुळे ठोस निर्णय घेत सार्वजनिक कल्याणासाठी राजकीय, सामाजिक परिस्थितीच्या पद्धतीनुसार बदलणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी द्विदल राजकीय व्यवस्था आवश्यक आहे. या वेळी माजी जि.प. सदस्य प्रभाकर जाधव, चाळीसगाव पत्रकार संघाचे सचिव अजय कोतकर, प्रा.दीपक आवटे, गुरुलिंग आवटे, संजय वैष्णव, नीलांजन आवटे हजर होते.

पायी दिंडीचा राेज ५० ते ६० किमी प्रवास
पायी दिंडीत सहभागी लिंगायत समाजाच्या नागरिकांनी शुक्रवारी प्रा.आवटे यांच्याकडे मुक्काम केला. शनिवारी पहाटे ते पमार्गस्थ झाले. पायी दिंडीत कर्नाटक राज्यातील लोणी, ता.चडचण, जि. विजापूर येथील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते बापूराय लोणी, त्यांचे सहकारी धर्माप्पा पटनी, आनंद कंबोज, सिद्धेश्वर सागर, विकास कंबोज, सागर परीट, संध्या पुजारी, नलिनी पुजारी, अंबय्या बाडीगर, प्रभावती जिरणके आदी सहभागी आहेत. ते दरदिवशी ५० ते ६० किलोमीटर प्रवास करतात.

बातम्या आणखी आहेत...