आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज पडली:अनर्थ टळला पण वीज कोसळल्याने‎ धरणगावजवळ पेटले नारळाचे झाड‎

धरणगाव‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव शहरासह ग्रामीण भागात रविवारी‎ सकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने‎ किरकोळ हजेरी लावली. या वेळी सोनवद‎ रोडवरील एका शेतातील नारळाच्या झाडावर‎ वीज कोसळल्याने नारळाचे झाड पेटले.‎

मात्र, सुदैवाने अनर्थ टळला. दरम्यान,‎ धरणगाव येथील राजेंद्र पाटील यांचे सोनवद‎ रोडवरील मोठ्या पाटाजवळ शेत आहे. या‎ शेतात त्यांनी काही नारळांची झाडे लावलेली‎ आहेत. यातील एका झाडावर किरकोळ‎ पाऊस सुरू असताना रविवारी सकाळी ८.३०‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाजेच्या सुमारास वीज पडली. त्यामुळे भर‎ पावसात नारळाचे झाड पेटले. तसेच‎ आजूबाजूचे झाडांना ही इजा पाेहाेचली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...