आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:गिरणा धरणातून सलग ३२ दिवसअखंड विसर्ग ; पहिल्यांदाच विक्रम

उमेश बर्गे | चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गिरणा धरणाच्या इतिहासात, यंदा पहिल्यांदाच गेल्या ३२ िदवसांपासून सलग िवर्सग सुरू आहे. दमदार पावसामुळे आवक कायम असल्याने धरणातून सुमारे १० हजार दलघफू पाणी नदीपात्रात सोडले आहे. हा विसर्ग धरणाच्या १०० टक्के जलसाठ्याच्या निम्मे आहे. धरणात झालेला जलसाठा लक्षात घेता, धरणातून आणखी पुढील दीड महिना असाच विसर्ग सुरू राहण्याचा अंदाज आहे. निम्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे, तसेच २१ हजार ५०० दलघफू क्षमतेचे गिरणा धरण आहे. १ लाख ४१ हजार ३६४ एकर क्षेत्र भिजवण्याची या धरणाची क्षमता आहे. यंदा जुलै महिन्याच्या सुरूवातीपर्यंत धरणात केवळ ३४ टक्के साठा होता. परंतु नंतर पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे, पाच िदवसातच धरणाने थेट नव्वदी आेलांडली होती.

सलग चौथ्यांदा शंभरी
यंदा सलग चाैथ्या वर्षी शंभरी गाठण्याचा योग आला. यंदाही नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने गिरणा धरणात पाण्याची आवक वाढली. धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाल्याने उपअभियंता हेमंत पाटील यंाच्याहस्ते जलपूजन करून, १६ जुलै राेजी धरणाचे वक्रद्वार क्रमांक १ व ६ प्रत्येकी १ फुटाने उघडण्यात आले. तेव्हा पासून धरणातून विसर्ग सुरू आहे. गेल्या ३२ दिवसांपासून विसर्ग करण्यात येत आहे.

सहा दरवाजे उघडले
यंदाच्या पावसाळ्याचा उरलेला कालावधी लक्षात घेता पुढील दीड महिना असाच विसर्ग सुरू राहण्याचे चिन्हे आहेत. तसे झाल्यास हा सुध्दा एक विक्रम ठरणार आहे. सध्या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून १४ हजार २५६ क्युसेक विसर्ग केला जात आहे. त्यामुळे िगरणा नदी दुथडी वाहत आहे. सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गिरणा धरणात सध्या ९२ टक्के साठा कायम
गिरणा धरण इतिहासात सलग चाैथ्यांदा व आतापर्यंत बाराव्यांदा शंभरी गाठणार आहे. धरणात आजच्या घडीला ९२.३३ टक्के साठा झाला आहे. धरणातून १६ जुलैपासून िवसर्ग सुरू असून, आजवर १० हजार दलघफू पाणी गिरणा पात्रात साेडले आहे. या पाण्याचे प्रमाण धरण साठ्याच्या िनम्मे आहे. -हेमंत पाटील, उपअभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव

नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याचा परिणाम
धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जुलैमध्येच उघडण्यात आलेले धरणाचे दरवाजे अद्यापही बंद झालेले नाहीत. िगरणा धरणाचे १९५९ मध्ये बांधकाम सुरू झाल्यानंतर दहा वर्षांत १९६९ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून गेल्या ५५ वर्षात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे जुलैमध्ये उघडण्याची वेळ आली. नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने धरण लवकर भरले व १६ जुुलैपासून िवर्सग सुरू आहे. एक ते दाेन दरवाजे उघडण्यापासून सहा दरवाजे एक ते दाेन फुटाने या काळात उघडण्यात आले. या काळात आतापर्यंत १० हजार दलघफू पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरण १०० टक्के भरल्यावर त्यात १८ हजार ५०० दलघफू िजवंत साठा हाेताे. धरणातील जलसाठ्याच्या निम्मे म्हणजेच ५० टक्के पाणी सोडण्यात आले आहे. हा आजवरचा विक्रम आहे. धरणावर अवलंबून गावे, शहरांचा पाणीप्रश्न मिटला आहे.

बातम्या आणखी आहेत...